लखीमपूर खिरी : लखीमपूर खिरीतील बजाज हिंदूस्थान शुगर लिमिटेडच्या गोला साखर कारखाना, पलिया आणि खंभारखेडाने गेल्या वर्षी, २०२१-२२ मध्ये खरेदी केलेल्या उसाचे पूर्ण पैसे अदा केले आहेत. गोला चीबनी कारखान्याकडून गेल्या वर्षी १३७.४४ लाख क्विंटल ऊस खरेदी करण्यात आला होता. त्याचे एकूण मूल्य ४७,७७६.७९ लाख रुपये होते. बुधवारी हे पैसे देण्यात आले आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पलिया साखर कारखान्याने गेल्या वर्षी १०८.४८ लाख क्विंटल ऊसाची खरेदी केली होती. त्याचे एकूण मूल्य ३७५ कोटी रुपये होते. हे पूर्ण पैसे देण्यात आले आहेत. खंभारखेडा साखर कारखान्याने २०२१-२२ मध्ये ८६.५१ लाख क्विंटल उसाची खरेदी केली. त्यापोटी शेतकऱ्यांना ३०१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. साखर कारखान्याचे पीआरओ सतीश श्रीवास्तव यांनी सांगितले की, गेल्या वर्षीची कोणतीही थकबाकी आता शिल्लक नाही. या वर्षीची ऊस बिले देण्यास लवकरच सुरुवात केली जाईल.