समस्तीपूर : आता जिल्ह्यातील शेतकरी तांत्रिकदृष्ट्या संपन्न होणार आहेत. पुसा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या कल्याणपूर फार्म येथे ऊस पीक व्यवस्थापनात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी ड्रोनची स्पीड ट्रायल करण्यात आली आहे.
न्यूज१८ मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कुलगुरू डॉ. पी. एस. पांडे यांनी सांगितले की, ड्रोनचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ड्रोनद्वारे पिकांचे मॅपिंग, रोगाची माहिती, रोग नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी व इतर विविध फायदे याबाबत माहिती देण्यात आली. विद्यापीठात लवकरच अॅडव्हान्स्ड सेंटर ऑफ डिजिटल अॅग्रीकल्चर सुरू करण्यात येणार असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र आणि इतर केंद्रांवरून शेतकरी भाड्याने ड्रोन घेऊ शकतात. यातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. ड्रोन पद्धत हे एक साधन आहे, जे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक लाभ देते.