शेतकऱ्यांसाठी खुशखबर : पीएम किसान योजनेच्या हप्त्यात होणार वाढ

लवकरच देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रती शेतकरी ६,००० रुपयांची वार्षिक रक्कम वाढवू शकते. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकरी कुटुंबांना मिळणारी मदत ५० टक्क्यांनी वाढू शकेल. म्हणजेच सध्याच्या योजनेत २०,००० ते ३०,००० कोटी रुपयांपर्यंतची अतिरिक्त आर्थिक मदत समाविष्ट केली जाऊ शकते.

याबाबत डीएनए इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात होणारी घसरण थांबवण्यासाठी केंद्र सरकार आणखी एक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यामध्ये किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी अंतर्गत शेतकऱ्यांकडून खरेदी वाढविण्याचा विचार केला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ वेबसाइटला सांगितले की, हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात देण्यात आला आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर दरवर्षी २०,००० ते ३०,००० कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील. योजना कधी लागू होईल याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय होऊ शकतो असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या वर्ष अखेरीस तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

पीएम किसान योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून सध्या ८०.५ कोटीहून अधिक कुटूंबांना मदत दिली जाते. कोविड महामारीच्या काळात अनेक कुटूंबांना यातून मदत मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here