उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादकांसाठी खुशखबर; ४ साखर कारखान्यांची गाळप क्षमता होणार दुप्पट, योगी सरकारने दिले १९६७ कोटी रुपये

लखनौ : उत्तर प्रदेशात ऊस शेतीवर आधारित अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. ऊस उत्पादनात राज्याने पहिले स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता साखर उत्पादन वाढवण्यावरही लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यातच राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. योगी सरकारने उत्तर प्रदेशातील चार साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश साखर कारखाना संघाच्या गजरौला, बागपत, मोरना आणि सेमीखेडा येथील साखर कारखान्यांची क्षमता वाढवली जाणार आहे. याशिवाय, रुद्र बिलासपूर साखर कारखान्याच्या तांत्रिक सुधारणांसाठी डीपीआर पाठवण्यात आला आहे.

‘इटीव्ही भारत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर कारखान्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी साखर कारखाना संघटनेला १९६७ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. साखर कारखान्यांच्या कामकाजावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी आयटी हस्तक्षेपाचा वापर केला जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत मीडिया सेलने ही माहिती दिली आहे. राज्यातील साखर उत्पादन वाढवण्यासाठी, साखर कारखाना संघटना सध्या त्यांच्या कार्यरत साखर कारखान्यांचे तांत्रिक अपग्रेडेशन, प्रभावी नियंत्रण आणि क्षमता विस्तार करत असल्याचेही पथकाने सांगितले. यासाठी गजरौला आणि बागपतच्या साखर कारखान्यांची गाळप क्षमता २५०० टीसीडी (प्रतिदिन टन ऊस) वरून ४९०० टीसीडी पर्यंत वाढवण्यात येत आहे. यासाठी अनुक्रमे ५४५.५२ आणि ५७० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात मोरणा साखर कारखान्याची क्षमता २५०० वरून ३५०० टीसीडी पर्यंत वाढवण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात क्षमता ५००० टीसीडी पर्यंत वाढवण्याचा डीपीआर ३० एप्रिलपर्यंत पाठवला जाईल. सेमीखेडा साखर कारखान्याची क्षमता २७५० टीसीडी वरून ३५०० टीसीडी पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here