नवी दिल्ली : देशांतर्गत आर्थिक घडामोडीत उदास जागतिक दृष्टिकोनामुळे आव्हानांचा सामना करावा लागत आहे. परंतु लवचिक देशांतर्गत आर्थिक परिस्थितींमधून अपेक्षित लाभांश आणि नवीन वाढीच्या संधी कायम आहेत, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ने म्हटले आहे. जागतिक भू-आर्थिक बदलांनी चालू आर्थिक वर्षात भारताला फायदेशीर स्थितीत आणले आहे. केंद्रीय बँकेने मंगळवारी जारी केलेल्या वार्षिक अहवालात ही टिप्पणी केली आहे. तर ६.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
झीन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी आर्थिक वर्ष २०२३-२४च्या संभाव्यतेवर आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्के आहे. कमकुवत जागतिक वस्तू आणि अन्नधान्याच्या किमती, रब्बी पिकासाठी चांगली शक्यता, कनेक्टिव्हिटी-केंद्रित सेवांमध्ये सातत्यपूर्ण तेजी, उत्पादनातील उच्च क्षमतेचा वापर, दुहेरी आकडी पत वाढ, उच्च चलनवाढ या सर्व बाबी लक्षात घेऊन हा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमती आणि उच्च इनपुट खर्चाच्या दबावात गेल्यावर्षीच्या घसरणीपासून पास-थ्रूमध्ये घट झाल्याने महागाईचे धोके कमी झाले आहेत असे अहवालात नमूद केले आहे. यंदा महागाईचा दर गेल्यावर्षीच्या ६.७ टक्क्यांच्या तुलनेत ५.२ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची अपेक्षा आरबीआयने व्यक्त केली आहे.