युएनकडून गुड न्यूज, ६.७ टक्के दराने वाढणार भारतीय अर्थव्यवस्था

संयुक्त राष्ट्रांकडून भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. जागतिक आर्थिक स्थित आणि शक्यतांच्या रिपोर्टमध्ये मध्यावधीपर्यंत देशांतर्गत मागणी मजबूत राहिल्याने भारतीय अर्थव्यवस्था २०२४ मध्ये ६.७ टक्के दराने वाढेल असे म्हटले आहे. यासोबतच या वर्षी, २०२३ मध्ये देशाच्या आर्थिक वाढीचा दर ५.८ टक्के राहिल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबत संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आर्थिक देखरेख विभागाचे प्रमुख हामीद रशिद यांनी भारताची अर्थव्यवस्था चमकदार स्थान मिळवले असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. यामध्ये बहुसंख्य सकारात्मक बाबी आहेत. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था एक मजबूत ठिकाण बनले आहे. भारताचा महागाईचा दर जवळपास ५.५ टक्के आहे. तर दक्षिण आशियाचा विभागीय सरासरी दर ११ टक्के आहे. त्यामुळे महसुली विस्तारात खूप वाव आहे. भारताचा जीडीपी वृद्धीचा दर २०२३ मध्ये ५.८ टक्क्यांवर येईल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, यूएनच्या रिपोर्टमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेबाबतही अनुमान जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, स्थानिक चलन कमकुवत असल्याने पाकिस्तान, श्रीलंकेसाठी महागाईचा दर दोन अंकी राहिल अशी शक्यता आहे. म्हणजे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला पाकिस्तान आणि दिवाळखोरी जाहीर केलेल्या श्रीलंकेत महागाईचा तडाखा सुरूच राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here