नवी दिल्ली : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली. जयशंकर यांनी या भेटीबाबतचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज दुपारी गुगल आणि अल्फाबेटच्या सीईओंशी भेटून आनंद झाला. आम्ही भारतात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ग्लोबल स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट्सविषयी चर्चा केली.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डॉ. जयशंकर यांनी ट्विटरवर जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ते पिचाई यांच्यासोबत आहेत. या फोटोत जी (गुगल) इंडिया लिहिले आहे. पिचाई सध्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी गुगल फॉर इंडियाची आठवी आवृत्ती दिल्लीतील प्रगती मैदानावर झाली. या कार्यक्रमात गुगलने आपल्या फाइल्स अॅपद्वारे डिजिलॉकर आणि गुगल पेचे नवे ट्रान्झॅक्शन सर्चसारख्या विशेषफिरचरी घोषणा केली. या कार्यक्रमानंतर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीचा फोटो त्यांनी ट्विट केला. आजच्या शानदार भेटीबाबत धन्यवाद. तुमच्या नेतृ्त्वाखाली तांत्रिक परिवर्तनाची गती पाहून प्रेरणा मिळते. भारतातील जी २० अध्यक्षतेच्या मदतीसाठी आम्ही पाठिंबा द्यायला सदैव तत्पर आहोत असे त्यांनी ट्विट केले आहे. पिचाई पाच वर्षानंतर भारत दौऱ्यावर आले आहेत.