केंद्र सरकारकडून संजीव चोपडा यांची ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अन्न तथा सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते १९९०च्या बॅचमधील ओडिशा केडरचे IAS अधिकारी आहेत.
या अधिसूचनेनुसार, त्यांची नियुक्ती ३१ ऑक्टोबर २०२२ पासून करण्यात आली आहे. ते सुधांशू पांडे यांच्या जागी काम करतील. पांडे हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
सुधांशू पांडे यांच्या अन्न सचिव पदाच्या कार्यकाळात, भारत साखरेचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि जगातील साखरेचा द्वितीय क्रमांकाचा निर्यातदार देश म्हणून पुढे आला आहे.