नवी दिल्ली : सरकारने इथेनॉलला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्याबाबत चांगल्या प्रतिक्रीया मिळत आहेत. केंद्र सरकारला आता पूर्ण विश्वास आहे की २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट गाठता येणे शक्य आहे. तेल मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, भारताने ९ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. आणि आपले आधीचे निर्धारीत २०२५ पर्यंत २० टक्क्यांचे उद्दीष्ट पूर्तीचा विश्वास आहे. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना पुरी यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात आम्ही ९ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. आम्हाला विश्वास आहे की, आगामी तीन वर्षात आम्ही ९ टक्क्यांवरून २० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकतो.
गेल्या वर्षी, सरकारने आपल्या आधीच्या उद्दीष्टानुसार पाच वर्षाआधी, २०२५ पर्यंत पेट्रोलसोबत २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्धार करण्यात आला. महागड्या इंधनाच्या आयातीवरील निर्भरता कमी करण्यास त्यामुळे मदत मिळेल. केंद्र सरकारने २०२२ मध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.