जीएसटीने भरली सरकारी तिजोरी, यंदा १८ लाख कोटींचे संकलन शक्य

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील अखेरच्या महिन्याचा, मार्च २०२३ मधील जीएसटी संकलनाचा डेटा अद्याप उपलब्ध झालेला नाही. मात्र, या महिन्यातही हे संकलन १.५० लाख कोटी रुपयांपर्यंत असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास या आर्थिक वर्षातील एकूण जीएसटी संकलन १८ लाख कोटींच्या जवळपास पोहोचेल असा अंदाज आहे. एक एप्रिलपासून २०२२-२३ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, त्यापूर्वी गेल्या ११ महिन्यांत जीएसटीने आकडेवारीचा आधीचा विक्रम मोडला आहे. मार्च २०२३ ची आकडेवारी अद्याप जारी झालेली नाही. त्यानुसार, आर्थिक वर्षातील संकलन १८ लाख कोटी रुपयांच्या जवळपास असेल. हा जीएसटी लागू झाल्यापासूनचा विक्रम ठरेल.

याबाबत आज तकने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, देशभरात एक जुलै २०१७ पासून जीएसटी कायदा लागू झाला. तेव्हापासून गेल्या सहा वर्षात १८ लाख कोटी रुपयांचा आकडा हा सर्वाधिक आहे. अर्थ मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, गेल्या ११ महिन्यात आतापर्यंत १६.४६ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यातून वर्षभरात कर संकलनात २२.७ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसते. मार्चमध्ये १य५० लाख कोटींचे कर संकलन अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार जीएसटी १८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here