नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर कारखानदारांना निर्यातीसाठी साखर उचलण्याची मुदत १५ दिवसांनी म्हणजे २० जुलै २०२२ पर्यंत वाढवली आहे. सरकारने ६ जून रोजी कारखान्यांना ८ लाख टन (LMT) साखर साठ्यास संयुक्त निर्यात रिलीज ऑर्डर जारी केली होती. अलिकडेच भारत सरकारने सावधगिरीचे पाऊल उचलताना हंगाम २०२१-२२ साठी साखर निर्यात १०० (LMT) पर्यंत मर्यादीत केली आहे.
याबाबतच्या अधिसूचनेनुसार, साखर कारखान्यांना आदेश जारी झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निर्यातीसाठी एकूण ८ LMT साखर निर्यातीसाठी पाठवणे, उचलण्याची अनुमती देण्यात आली होती. साखर कारखाने निर्धारित मुदतीमध्ये निर्यातीसाठी देण्यात आलेल्या कोट्यानुसार साखर पाठविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, लॉजिस्टिक सेवेची अडचण आणि पावसाळा सुरू झाल्यामुळे काही विभागातील साखर कारखान्यांना निर्यातीसाठी साखर वेळेवर उचलण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.