नवी दिल्ली :
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार ज्या अडचणींना तोड द्यावे लागत आहे. त्यावर एक कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा मार्ग शोधण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. इथेनॉलमुळे पैशांची बचत तर होतच आहे. पण, त्याचबरोबर पेट्रोलमुळे जे हानिकारक वायू हवेत सोडले जातात त्याचे प्रमाण देखील कमी होणार आहे. देशाने बायोइंधनासंदर्भातील लक्ष्य निश्चित आले आहे आणि या गोष्टी केवळ चर्चा करण्यापूरती मर्यादीत गोष्ट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात २०२२पर्यंत १० इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे तर,२०३०पर्यंत ते २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. यासाठी निश्चित धोरण ठरवले जात आहे. त्याची जबाबदारी निश्चित केली जात असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. बायोइंधनासाठी निश्चित करण्यात आलेले लक्ष्य गाढण्यासाठी कालावधी ठरवण्यात आला आहे. तो प्रत्येक टप्प्यावर त्यावर लक्ष ठेवले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
इथेनॉल मिश्रित बायोइंधनासाठीचे इतके मार्ग उपलब्ध आहेत त्यासंदर्भात एक धोरणच सरकारने तयार केल्याचे मोदींनी सांगितले.