गव्हाने भरताहेत सरकारी गोदामे, उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांपर्यंत झाली खरेदी

नवी दिल्ली : यंदा सरकारने गव्हाच्या खरेदीला गती दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २५ एप्रिल म्हणजे कालपर्यंत सरकारने आपल्या उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक खरेदी केली आहे. सरकारने गेल्यावर्षी १.८८ कोटी टन गव्हाची खरेदी केली होती. त्यामुळे यंदा किमतीवर याचा किती परिणाम होईल आणि या वर्षी गव्हाचे उत्पादन किती आहे, पावसाने किती उत्पादन घटले आहे याचा अंदाज घेतला जात आहे.

मनीकंट्रोलने वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने गव्हाच्या खरेदीचे आपले निम्मे लक्ष्य गाठले आहे. सरकारने २४ एप्रिलपर्यंत १.७० कोटी टन गहू खरेदी केला आहे. या वर्षी ३.४१ कोटी टन गव्हाच्या खरेदीचे उद्दिष्ट आहे. २०२२ मध्ये या कालावधीत सरकारने १.३६ कोटी टन गहू खरेदी केला होता. एप्रिल २०२३ पासून खरेदी सुरू झाली आहे. ज्यादा खरेदीमुळे पीडीएसला मदत होईल. सरकार मे महिन्यात पीडीएस वितरणाचा निर्णय घेऊ शकेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आपल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक गहू खरेदीची तयारी ठेवली आहे. गहू खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. जवळपास १७ लाख हून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. सरकार गव्हाच्या खरेदीवर ३६,३०१ कोटी रुपये खर्च करेल.

पंजाबमध्ये २५ एप्रिलअखेर ८३.५९ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली आहे. तर हरियाणात ५२.६२ लाख मेट्रिक टन, मध्य प्रदेशमध्ये ४६.२० लाख टन, उत्तर प्रदेशात ९४,६३३ मेट्रिक टन, राजस्थानमध्ये ३८,१२४ मेट्र्क टन आणि उत्तराखंडमध्ये १०६ मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here