कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने शुक्रवारी व्यापार्यांवर साठा मर्यादा मानदंडांना लागू करण्याचा निर्णय घेतला. अनेक राज्यांमध्ये कांद्यांच्या किंमतीमध्ये वाढ कायम आहे.
होलसेल विक्रेत्यांसाठी कांद्याच्या स्टॉक लिमिटला 25 मेट्रीक टन आणि रिटेल व्यापार्यांसाठी 2 मेट्रीक टन निश्चित करण्यात आला आहे. आयातित कांद्यांवर ही लिमिट लागू होणार नाही.
उपभोक्ता मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करुन सांगितले की, कांद्यांच्या वाढत्या किंमती नियंत्रीत करणे आणि तस्करी रोखण्यासाठी मोदी सरकारकडून त्वरीत पावले उचलली गेली आहेत. रिटेल विक्रेत्यांसाठी कांद्याच्या स्टॉक लिमिट ला 25 मेट्रीक टन व रिटेल व्यापार्यांसाठी 2 मेट्रीक टन निश्चित केला आहे.
त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये सांगितले की, ग्राहकांना फायदेशीर मूल्यावर कांदा उपलब्ध करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सरकारकडून अनेक पावले उचलली गेली आहेत. यामध्ये कांद्याच्या निर्यातीवर प्रतिबंधापासून आयातीच्या नियमांमध्ये शिथिलता आणि बफर स्टॉक मधून कांद्याचा पुरवठा करण्यासारखी पावलेही सामिल आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.