ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न

लखनौ : उत्तर प्रदेशच्या ऊस विभागाने सेंद्रीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न सुरू केले आहेत. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अलिकडेच विभागाने UP Council of Sugarcane Research (UPCOSR) च्या संशोधकांना ऊस शेतीमधील रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी जैव उत्पादनांसाठी अधिक प्रयत्न करावेत असे निर्देश दिले आहेत. याशिवाय, ऊस आणि साखर उद्योगाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांनी ऊस संशोधन परिषदेला ऊस उत्पादकांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचे विकसन करावे अशा सूचना केल्या आहेत.

भुसरेड्डी म्हणाले की, या उपाय योजनांमुळे रासायनिक खते आणि स्प्रे केल्याने होणारे माती आणि हवेतील प्रदूषण कमी होईल अशी अपेक्षा आहे. जैव खते पर्यावरणाला अनुकूल आणि किफायतशीर असतात. यासोबतच ती मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पिक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. UPCOSR आता ऊस उत्पादकांसाठी चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचे उत्पादन करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here