सरकारकडून इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना आणखी साखर वळविण्याची अनुमती शक्य : रिपोर्ट

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी आणखी साखर वळविण्याची परवानगी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार इथेनॉलसाठी अतिरिक्त ८,००,००० टन साखरेचा वापर करण्याची कारखान्यांना परवानगी देण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार करत आहे. सद्यस्थितीत साखर उत्पादन अनुमानापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंजूर असलेल्या १.७ दशलक्ष टन साखर वळविण्यापेक्षा हे प्रमाण अधिक असेल.

भारतातील उसाचा गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांनी गाळप करणे थांबवले आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा २०२३-२४ या साखर हंगामात ३१ मार्च २०२४ अखेर साखरेचे उत्पादन ३०२.०२ लाख टनापर्यंत पोहोचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here