हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
बाजारपेठेतील अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार साखरेची गोदामे उभारण्याचा विचार करत आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या दरांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांची देणी भागवणेही शक्य होणार आहे.
देशातील साखरेचा बफर स्टॉक २० लाख टनांवरून ५० लाख टन केला जाण्याची शक्यता आहे. मुळात भारतात साखरेचे उत्पादन चांगले होते. त्यामुळे यापूर्वी अतिरिक्त पुरवठ्याला तोंड देताना बफर स्टॉकचाच पर्याय अवलंबला जात होता. देशांतर्गत बाजारातील अतिरिक्त पुरवठ्याला तोंड दिले जात होते. आता सरकारने जर अशी गोदोमे उभी केली तर, साखर कारखान्यांना अतिरिक्त पुरवठ्याची चिंता राहणार नाही. कारखाने त्यांच्या गोदामांमध्ये साखर साठवून ठेवतील आणि सरकार त्यांना साखर साठवणुकीचे पैसे देईल.
उसाच्या एफआरपीमुळे सध्या साखर कारखान्यांची आर्थिक बाजू ढासळली आहे. २०१७-१८च्या हंगामातील अतिरिक्त साखरेचा साठा शिल्लक आहे. जर, सरकारने ५० लाख टन बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला. तर, साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांची देणी भागवणे शक्य होणार आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp