मुंबई : महाराष्ट्र सरकारने विविध १२ कंपन्यांसोबत ५ हजार ५१ कोटी रुपयांच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, या सामंजस्य करारामधून ९,००० हून अधिक रोजगारांची निर्मिती होईल.
याबाबत सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, देसाई यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या योजनेअंतर्गत १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षिक झाली आहे. यामधून ३.३४ लाक रोजगारांची संधी मिळाली आहे. निवेदनात म्हटले आहे की, या एमओयूमधून माहिती तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, जैवइंधन, इलेक्ट्रिक वाहने, इथेनॉल उत्पादन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रांना प्रोत्साहन मिळणार आहे.