लखनौ : राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिलांची थकबाकी देण्यासंबंधीची प्रक्रिया गतीने केल्याचा दावा उत्तर प्रदेशचे साखर उद्योग मंत्री सुरेश राणा यांनी केला. नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांना विरोध होत असतानाच नव्याने २१ साखर कारखाने सुरू करून आधीच्या सरकारच्या तुलनेत अधिक चांगले काम झाल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री सुरेश राणा म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून योगी आदित्यनाथ सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १.२ लाख कोटी रुपये दिले आहेत. समाजवादी पार्टीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात फक्त ९५००० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. यापूर्वी समाजवादी पार्टी आणि बहूजन समाज पार्टीच्या सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात २१ साखर कारखाने कमी किमतीने विकले गेले होते असा आरोप मंत्री राणा यांनी यावेळी केला.
राणा म्हणाले, सरकारने बागपतमधील रमाला, बस्तीमधील मुंडेरवा आणि गोरखपूर येथील पिपराइचमध्ये नव्या साखर कारखान्याची स्थापना केली आहे. विरोधी पक्षनेते, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या मतदारसंघ आजमगढमधील सठियाव साखर कारखान्याची उपेक्षा केल्या आरोपही चुकीचा आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी अलिकडेच साखर कारखान्यांकडून थकीब बिलांमुळे शेतकऱ्यांचे १०००० कोटी रुपये अडकल्याचा आरोप केला होता. राणा यांनी दावा केला की राज्य सरकारने समांतर ऊस खरेदी केंद्रे चालविणाऱ्या माफियांवरही प्रहार केला आहे.