ब्राझीलच्या धर्तीवर सरकारने इथेनॉल मिक्सींगचे धोरण जाहीर करावे : अमोल कोल्हे

निवृत्तीनगर : दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे ऊसाचे खूप नुकसान झाले. यामुळे साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट असून साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहीर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 34 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शिरुर लाकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी कारखान्याच्या विकासाकरीता सत्यशिल शेरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या हितासाठी काम करणार असल्याचे आम. अतुल बेनके यांनी सांगितले. यावेळी दिलीप ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्यशिर शेरकर म्हणाले, विघ्नहर कारखान्याने ऊस उत्पादकांना सतत सांगला भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आयकर विभागाने विघ्नहर कारखन्याला जास्त भाव दिल्याने 205 कोटी रुपये कर भरण्याची नोटीस पाठवली आहे. यामुळे कारखाने चालू ठेवणे अशक्य होणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी स्पष्ट केले. तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2018-19 साठी गळीतास आलेल्या ऊसास विनाकपात 2950 रुपये प्र. मे.टन दर देण्याचे ठरविले असल्याची माहितीही शेरकर यांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here