मलेशियामध्ये साखरेच्या किमतीचा सरकारने आढावा घेण्याची मागणी

क्वालालंपूर : साखरेचा दर आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी साखरेच्या किमतीचा आढावा घेण्याची गरज आहे अशी मागणी MSM Malaysia Holdings Bhd (MSM मलेशिया) ने सरकारकडे केली आहे. एमएसएमचे मलेशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैयद फिजल सैयद मोहम्मद यांनी सांगितले की, साखरेच्या दराचा आढावा घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. हा निर्णय घेण्याची जबाबदारी संपूर्णपणे सरकारची आहे. सरकार आपल्या वेळेनुसार कधीही याविषयी निर्णय घेऊ शकते. देशाला साखर पुरवठा करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मात्र यासोबतच आम्हाला या व्यवसायातून नफाही मिळण्याची अपेक्षा आहे.

सैयद फिजल सैयद मोहम्मद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही सरकारसोबत चर्चा करीत आहोत. मालाची चढ-उतार, ऊर्जा, परकीय चलनावरील खर्च याबाबतचा ताण समजून घेण्याची गरज आहे. ते म्हणाले की देशातील खाद्य सुरक्षेबाबत शुगर रिफायनरी आताही आपले कामकाज सुरू ठेवेल. साखरेच्या वाढत्या किमतीचा ग्राहकांवर फारसा परिणाम पडणार नाही असा दावा सैयद फिजल यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here