पोर्वोरियम : सहकार मंत्री गोविंद गौडे यांनी गोवा विधानसभेत आश्वासन दिले की संजीवनी साखर कारखाना बंद होणार नाही आणि सध्याचे संकट कायम राहिल्यास इथेनॉल सारख्या वैकल्पिक उत्पादनांचा बदली म्हणून विचार केला जाईल.
ते म्हणाले, साखर कारखान्याच्या सद्य स्थितीला सरकारी अधिकारी आणि शेतकर्यांना जबाबदार धरले जात आहे. जर आपण ऊस उत्पादन घेवू शकत नसाल आणि इतर राज्यातून ऊस मिळू शकला नाही तर पुढचा पर्याय कोणता?
मुख्यमंत्र्यांनी यासाठी दुसरा पर्याय शोधण्याचे सांगितले असल्याचेही ते म्हणाले.
गौडे म्हणाले, दादासाहेब शुगर इन्स्टिट्यूटच्या अहवालामध्ये कारखान्यात जुनी यंत्रणा बसविण्यात आली असल्याचे आढळून आले. कारखान्याच्या नुतनीकरणावर 35 करोड रुपये आणि यंत्रसामुग्रीवर 75 करोड रुपये खर्च केल्यास कारखाना फायदेशीर राहिल की नाही हे तपासण्यासाठी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूरचा अहवाल मागविला आहे. साखर उत्पादन करण्यास कारखाना सुरु राहील याची खात्री करुन घेणार. आणि जर कारखाना साखर उत्पादनास असमर्थ ठरला तर अल्कोहोलचे उत्पादन करण्यासारखे पर्याय पाहू, असे सांगितले. येत्या दोन ते तीन महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल.
रविवारी पीडब्ल्यूडी मंत्री आणि संवॉर्दमचे आमदार दीपक पौस्कर म्हणाले की, संजीवनी साखर कारखान्यात काम करणार्या कामगारांच्या हितरक्षणासाठी प्रयत्नशील राहू.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.