नव्या तंत्रज्ञानाने ऊस उत्पादन घेतल्यास सरकार देणार शेतकऱ्यांना अनुदान

कॅथल : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. हरियाणा राज्यातील ऊस उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी एक खास योजना जाहीर केली आहे. जर या योजनेनुसार शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन केले, तर त्यांना अनुदान दिले जाईल. अलिकडेच सरकारने ही टेक्नॉलॉजी मिशन ऑन शुगरकेन योजना लाँच केली आहे. त्यानुसार ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती एकरी अनुदान देण्यासाठी सर्व सहाय्यक ऊस विकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्जांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

हरीभूमी डॉटकॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मिशन टेक्नॉलॉजी ऑन शुगरकेन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांनी यासाठी चार फुटी सरी सोडून ऊस लागवड करावी लागेल. उसामध्ये गहू, डाळी, भाजीपाला असे पूरक पिकांचे उत्पादन घ्यावे लागेल. पूरक पिकांसह ऊस उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना प्रती एकर ३,६०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने चार फुटी सरी सोडून ऊस उत्पादन घेतले आणि पूरक पिके घेतली नाहीत, तर अशा शेतकऱ्याला प्रती एकर ३००० रुपये अनुदान मिळेल. या दोन्ही योजनांसाठी ऊस विभागाने ८०० एकर क्षेत्र निश्चित केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शेतकऱ्यांना नर्सरीसाठी प्रती एकर ५,००० रुपये अुदान दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here