सरकारने स्टीलवरील निर्यात शुल्क मागे घेतले

केंद्र सरकारने 22 मे, 2022 पूर्वी प्रचलित असलेली स्थिती कायम ठेवून 58% लोह मात्रा असलेली लोह सामग्री, लोह धातूच्या गोळ्या आणि पिग आयर्नसह, निर्दिष्ट स्टील उत्पादनांवरील निर्यात शुल्क मागे घेतले आहे. अँथ्रासाइट/पीसीआय कोळसा, कोकिंग कोळसा, कोक आणि सेमी कोक आणि फेरोनिकेलवरील आयात शुल्क सवलतीही मागे घेण्यात आल्या आहेत.

अशा प्रकारे, 19 नोव्हेंबर 2022 पासून खालील प्रमाणे शुल्क लागू होईल –

  • 58% पेक्षा अधिक लोखंडाची मात्रा असलेल्या (< 58%Fe) लोखंडाच्या गुठळ्या आणि दंड याच्या निर्यातीवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल.
  • 58% पेक्षा कमी लोखंडाची मात्रा असलेल्या (58% Fe >) लोहखनिज गुठळ्या आणि दंडाची निर्यात केल्यास 30% नी कमी निर्यात शुल्क लागू होईल.
  • लोखंडाच्या गोळ्यांच्या निर्यातीवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल.
  • पिग आयर्न आणि स्टील उत्पादनांच्या निर्यातीवर पुढील प्रमाणे वर्गीकृत केलेल्या HS 7201, 7208, 7209, 7210, 7213, 7214, 7219, 7222 आणि 7227 उत्पादनांवर शून्य निर्यात शुल्क लागू होईल
  • अँथ्रासाइट/पीसीआय आणि कोकिंग कोळसा आणि फेरोनिकेलवर २.५% आयात शुल्क लागू होईल.
  • कोक आणि सेमी कोकवर ५% आयात शुल्क लागू होईल.

मे, 2022 मध्ये, स्टीलच्या किमतीत तीव्र आणि सततची वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तयार पोलाद आणि स्टील उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल किंवा लागणारी इतर सामग्री या दोन्हींची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दर निश्चिती संबंधी अनेक उपाय केले. 22 मे, 2022 पासून, 58% पेक्षा जास्त लोह मात्रा असलेल्या लोह धातूच्या गुठळ्यांवरील निर्यात शुल्क 30% वरून 50% पर्यंत वाढविण्यात आले; 58% पेक्षा कमी लोहाची मात्रा असलेल्या लोह खनिजावर 50% निर्यात शुल्क लावण्यात आले; लोखंडाच्या गोळ्यांवर 45% एवढे निर्यात शुल्क लावण्यात आले; पिग आयरन (HS 7201, 7208, 7209, 7210, 7213, 7214, 7219, 7222, 7227) सह मिश्रधातू आणि नॉन-अलॉय स्टीलच्या विविध प्रकारांवर 15% पर्यन्त ऍड व्हॅलोरेम निर्यात शुल्क लादण्यात आले आणि पीसीआय कोळसा, कोकिंग कोळसा, कोक आणि सेमी कोक आणि फेरोनिकेल उत्पादनांच्या आयात शुल्कावर सूट देण्यात आली.

सध्याच्या या उपाययोजनांमुळे देशांतर्गत पोलाद उद्योगाला चालना मिळेल आणि निर्यातीलाही चालना मिळेल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here