शासनाच्या कल्याणकारी योजना ऊस तोडणी कामगारांपर्यंत पोहोचाव्यात : शिवाजी हुसे

अहमदनगर : साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत. मात्र, ऊस तोडणी कामगारांची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. ऊस तोडणी कामगारांपर्यंत शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना पोहोचाव्यात, अशी अपेक्षा डॉ. शिवाजी हुसे यांनी व्यक्त केली. पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित ‘मराठी साहित्यातील ऊस तोडणी कामगारांचे चित्रण’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश आव्हाड होते.

व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार व मुकादम संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. दत्तात्रय राठोड, साहित्यिक डॉ. कैलास दौंड, डॉ. सोमनाथ घोळवे, डॉ. सूर्यकांत नेटके, डॉ. दिलीप बिरुटे, मराठी विभागप्रमुख डॉ. सुभाष शेळके उपस्थित होते.

डॉ. शिवाजी हुसे म्हणाले की, ऊसतोडणी आणि साखरेचे उत्पादन यामधील ऊसतोड कामगारांची भूमिका महत्त्वाची आहे. या कामगारांमुळे साखर कारखानदारी आज एका उंचीवर पोहोचू शकली. डॉ. कैलास दौंड म्हणाले, पाथर्डी हा आता ऊसतोड कामगारांचा तालुका न राहता, नोकरदारांचा तालुका म्हणून पुढे येत आहे.

डॉ. संदीप सांगळे, डॉ. अर्जुन चितळे, डॉ. दत्तात्रय राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अर्जुन केरकळ, डॉ. अशोक डोळस यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुभाष शेकडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here