नवी दिल्ली : केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी २०२२ रोजी केलेल्या अधिसूचनेनुसार अन्न मंत्रालयाने मार्च २०२२ साठी देशातील ५६६ कारखान्यांना साखर विक्रीसाठी २१.५० लाख टन कोटा मंजूर केला आहे.
यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत जादा साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ साठी २० लाख टन कोटा मंजूर केला होता. तर मार्च २०२१ च्या तुलनेत यावेळी जादा कोटा मंजूर केला आहे. सरकारने मार्च २०२१ मध्ये २१ लाख टन साखर विक्रीस मंजुरी दिली होती.
उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोटा फक्त ०.५० लाख टनाने अधिक आहे. मात्र, उन्हाळ्याची सुरुवात झाली असल्याने मागणी वाढण्याची शक्यता आहे. साखरेचा दर ६० ते ८० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असे मत एक्स्पर्टसनी व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आणि दरामध्ये स्थिरता आणण्यासाठी मासिक कोटा पद्धत स्वीकारली आहे.