केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ३१ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार फेब्रुवारी २०२३ साठी देशातील ५५४ साखर कारखान्यांसाठी २१ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला आहे.
यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने जानेवारी २०२३ साठी २२ लाख टन साखर विक्री कोटा वाटप केला होता. तर दुसरीकडे फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत यावेळी समान साखर कोटा वितरण करण्यात आले आहे. सरकारने फेब्रुवारी २०२२ साठी २१ लाख टन साखर मंजूर केला होती.
बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार, फेब्रुवारी महिन्यातील स्थिती पाहता खूप संतुलित कोटा देण्यात आल्याने बाजारात स्थिरता टिकून राहणार आहे.