केंद्र सरकारकडून मार्च 2020 साठी 21 लाख टन साखर विक्री कोटा

नवी दिल्ली: 28 फेब्रुवारीला काढलेल्या अधिसूचनेमध्ये सरकारच्या खाद्य मंत्रालया ने मार्च साठी देशातील 545 कारखान्यांना साखर विक्रीचा 21 लाख टन कोट्याचे वाटप केले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत अधिक साखरेचे वाटप करण्यात आले आहे. खाद्य मंत्रालयाने फेब्रुवारी 2020 साठी 20 लाख टन साखर विक्री कोटयाला मंजूरी दिली होती. तर दुसरीकडे मार्च 2019 च्या तुलनेत यंदा 3.5 लाख टन कमी साखर वाटप केली आहे. सरकार ने मार्च 2019 साठी 24.5 लाख टन साखरेचे वाटप केले होते.

साखर उद्योगातील जाणकारांच्या मते, या महिन्यात उन्हाळा असल्याने साखरेचा व्यापार सकारात्मक राहण्याची आशा आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार चांगल्या मागणीबरोबरच बाजारातील उपयुक्त लाभांचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांना साखरेचा साठा करण्यात रस आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here