केंद्र सरकारकडून मे २०२२ साठी २२.५० लाख टन साखर विक्रीचा कोटा जारी

केंद्र सरकारच्या खाद्य मंत्रालयाने २९ एप्रिल २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील ५३१ साखर कारखान्यांसाठी साखर विक्रीचा २२.५० लाख टनाचा कोटा मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत जादा साखर मंजूर करण्यात आली आहे. खाद्य मंत्रालयाने एप्रिल २०२२ साठी २२ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला होता. दुसरीकडे मे २०२१ च्या तुलनेतही यावेळी जादा कोटा देण्यात आला आहे. सरकारने मे २०२१ साठी २२ लाख टन साखर कोटा मंजूर केला होता.

उद्योगातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी देशात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आणि मंजूर कोटा २२ लाख टन होता. मात्र, आता निर्बंध हटविल्याने चांगली स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच हंगामातील मागणीमुळे वाढ दिसून येत आहे. साखरेचा दर ८० रुपये ते १०० रुपये प्रती क्विंटल वाढण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आणि दर निश्चितीमध्ये सुधारणा आणण्यासाठी मासिक कोटा पद्धती स्वीकारली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here