केंद्र सरकारने ३० मे २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारच्या अन्न मंत्रालयाने देशातील ५६० कारखान्यांना जून २०२३ साठी साखर विक्रीसाठी २३.५० लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे. जून २०२२ च्या तुलनेत २.५० लाख टन कोटा मंजूर करण्यात आला आहे. तर गेल्या महिन्याच्या तुलनेत ०.५० लाख टन कमी कोटा मंजूर केला आहे.
बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जून २०२२ च्या तुलनेत २.५० लाख टन अधिक साखरेचा कोटा जारी केला आहे. सरकारने साखरेच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बाजारात साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता कमी आहे.
केंद्र सरकारने साखर पुरवठा नियंत्रित ठेवणे आणि दर निश्चितीमध्ये स्थिरतेसाठी मासिक कोटा वितरण प्रणाली लागू केली आहे.