सरकारकडून क्रूडवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ, मात्र एटीएफ, डिझेलच्या टॅक्समध्ये कपात

सरकारने एकीकडे देशतील पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा दिला आहे तर दुसरीकडे झटकाही दिला आहे. सरकारने आजपासून क्रूड, डिझेल आणि एव्हिएशन फ्युएलमधील विंडफॉल टॅक्समध्ये बदल केले आहेत. सरकारने क्रूड ऑईलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. तर डिझेल, एअर टर्बाइन फ्युएलच्या एक्स्पोर्टवर अतिरिक्त कर कपात केली आहे. क्रूड ऑईलच्या विंडफॉल टॅक्समध्ये किरकोळ बदल केला आहे. हा कर ४३५९ रुपये प्रती टनावरून ४४०० रुपये प्रती टन करण्यात आला आहे. तर डिझेलची एक्स्पोर्ट ड्युटी २.५ रुपये प्रती लिटरने घटवून ०.५ रुपये प्रती लिटर केली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, एअर टर्बाइन फ्युएल एक्स्पोर्टवरील कर समाप्त करण्यात आला आहे. हे नवे दर आज, ४ मार्च २०२३ पासून लागू केले आहेत. जुलै २०२२ मध्ये भारत कच्च्या तेल उत्पादकांवर विंडफॉल टॅक्स लागू करून त्या देशांमध्ये आपला समावेश केला होता, जे एनर्जी कंपन्यांच्या नफ्यावर कर आकारणी करतात. जागतिक मार्केटमध्ये क्रुड ऑईल, पेट्रोल, डिझेल, एटीएफसारख्या रिफायनरी उत्पादनाचे दर वेळोवेळी कमी-अधिक होत असतात. निश्चित मर्यादेवर नफ्यावर विंडफॉल टॅक्सची आकारणी केली जाते. सोमवारी याबाबत संसदेत माहिती देताना सरकारने सांगितले की, अॅडिशनल एक्साइज ड्युटी लागू केल्यानंतर चालू आर्थिक वर्षात सरकारची कमाई २५,००० कोटी रुपये झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here