नवी दिल्ली : अतिरिक्त साठा उपलब्ध झाल्यावर सरकार साखर निर्यातीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकते. याबाबत PTI मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या घडामोडींशी संबधित सूत्रांनी सांगितले की, भारत गाळप हंगाम २०२४-२५ मधील उसाची अंतिम लागवड आणि उत्पादनाच्या आकलनानंतर साखर निर्यातीच्या परवानगीबाबत कोणताही निर्णय घेईल. भारताला पुढील हंगामात ३० मिलियन टन साखर उत्पादनाची अपेक्षा आहे.
सप्टेंबर महिन्यात समाप्त होणाऱ्या सध्याच्या हंगाम २०२३-२४ साठी साखर उत्पादन आतापर्यंत ३१.५ मिलियन टनापर्यंत पोहोचले आहे. अंतिम साखर उत्पादन ३१.८ मिलिटन टनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. PTI ला सूत्रांनी सांगितले की, उद्योगाने १० लाख टन साखर निर्यातीची मागणी केली आहे. आम्ही पुढील वर्षी कमी साखर उत्पादनाची अपेक्षा करीत आहोत आणि इथेनॉल उत्पादनासाठी शिल्लक साठ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारचे प्राधान्य देशांतर्गत खपासह इथेनॉलसाठी साठा उपलब्ध करण्यास असेल. अतिरिक्त साठा उपलब्ध झाल्यावर निर्यातीला परवानगी दिली जाऊ शकते. सरकार जुलैनंतर साखर उत्पादनाच्या स्थितीचा आढावा घेईल. तेव्हा मान्सूनचा विस्तार झालेला असेल आणि उसाच्या लागवडाचा अंतिम डेटाही उपलब्ध होईल.