वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सात कमोडिटीजच्या वायदा ट्रेडिंगवर तत्काळ प्रभावाने बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीने तत्काळ आदेश देऊन या सर्वांवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. यातून महागाईवर आळा घालता येईल अशी अपेक्षा सरकारला आहे. तांदूळ, गहू, हरभरा, मूगळ, कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि मोहरी यांसारख्या कमोडिटीजचा यात समावेश आहे.
सद्यस्थितीत विशेष म्हणजे ग्राहक महागाईचा दर ३ महिन्यांच्या उच्चांकावर आहे. ग्राहक महागाईचा दर ४.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर घाऊक महागाई 12 वर्षातील सर्वोच्च पातळीवर आहे. घाऊक महागाईचा दर १४.२३ टक्के आहे. ही वाढती महागाई लक्षात घेऊन सरकारने ही बंदी घातली आहे.
केंद्र सरकारला वाढत्या महागाईमुळे विरोधकांच्या दबावाला सामोरे जावे लागत आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील निवडणुकांदरम्यान सरकारला महागाईचा मुद्दा विरोधकांच्या हाती जाऊ नये यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. नोव्हेंबर महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक ४.९१ टक्क्यांच्या तीन महिन्याच्या उच्चांकावर पोहोचल्याचे दिसून आले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एक्साईज ड्यूटमध्ये दिलासा देऊनही त्याचा महागाईवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे आता वायदे बाजारातील ट्रेडिंग थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.