एकंदर अन्नसुरक्षेचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि साठेबाजी आणि कृत्रिम भाववाढ करण्यासाठी होणारी भाकिते रोखण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ व्यापारी, मोठ्या साखळ्यांमधील किरकोळ व्यापारी आणि प्रक्रियाकर्ते यांनी त्यांच्याकडे असलेल्या गव्हाचा साठा (https://evegoils.nic.in/wheat/login.html) या पोर्टलवर 01.04.2024 पासून आणि नंतर पुढील आदेश येईपर्यंत दर शुक्रवारी जाहीर करणे अनिवार्य असेल असा निर्णय घेतला आहे. सर्व संबंधित कायदेशीर संस्थांनी हा साठा नियमितपणे आणि योग्य प्रकारे जाहीर केला जात आहे याची खातरजमा करावी.
तसेच, गव्हाच्या साठ्याची सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व श्रेणीतील संस्थांसाठी साठवणुकीची मर्यादा 31.03.2024 रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर सर्व संस्थांना गव्हाचा साठा पोर्टलवर जाहीर करावा लागेल. तांदळाच्या साठ्याची सर्व श्रेणीतील संस्थांकडून माहिती देण्याचे आदेश यापूर्वीच लागू आहेत. ज्या संस्थेने पोर्टलवर नोंदणी केली नसेल, त्यांनी ती करून घ्यावी आणि दर शुक्रवारी गहू आणि तांदूळ यांच्या साठ्याची माहिती जाहीर करावी. आता सर्व कायदेशीर संस्थांनी पोर्टलवर नियमितपणे गहू आणि तांदूळ यांच्या साठ्याची माहिती जाहीर केली पाहिजे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग गहू आणि तांदळाच्या साठ्यावर भाववाढ रोखण्यासाठी आणि देशभरात त्यांची सहजपणे उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहे.
(Source: PIB)