1.3 करोड आयकर दाते करण्याचे सरकारचे लक्ष्य

नवी दिल्ली: चालू अर्थिक वर्षामध्ये 1.3 करोड आयकर दाते करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याची वित्त मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली. गेल्या वर्षी 1.1 करोड नवीन आयकर दात्यांची संख्या होती.
2018-19 च्या मूल्यांकन वर्षामध्ये 8.44 कोटी करदाते होते. ज्यांनी 2018-19 मध्ये करपरतावा भरलेला नाही पण 2017-18 च्या अर्थिक वर्षादरम्यान हा परतावा कापून घेतलेल्या सर्व व्यक्तींचा 2018-19 च्या अर्थिक वर्षातील मूल्यांकनात समावेश केला आहे.
हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीकृत नॉन-फाइलर मॉनिटरींग सिस्टम (एनएमएस) द्वारे कर न भरणारे ओळखणे, संभाव्य कर परतावा न भरणारे ओळखण्यासाठी विशिष्ट धोरणे तयार करणे, त्याचे पालन या अंमलबजावणीसाठी वैधानिक नोटिस जारी करणे यासह विविध योजना राबवल्या जात आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here