नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच निर्यातदारांच्या मदतीसाठी २४×७ हेल्पलाईन क्रमांक जारी करणार आहे. तेथे निर्यातदार आपल्या अडचणी, शंकांचे निरसन करू शकतील अशी माहिती व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नोएडा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये नॅशनल वाणिज्य सप्ताहाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री गोयल म्हणाले, कोविड १९च्या सुरुवातीला सरकारने व्यापाऱ्यांसाठी अशा प्रकारची हेल्पलाइन सुरू केली होती. मात्र, आम्हाला असे लक्षात आले आहे की, निर्यातदारांशी संबंधीत प्रकरणांचे, अडचणींचे निराकरण करण्यासाठी अशा प्रकारच्या हेल्पलाईनची गरज आहे. जर आवश्यकता भासली तर निर्यातदारांचा मुद्दा उच्च स्तरापर्यंत मांडता येऊ शकतो. सरकार लवकरच हेल्पलाईन क्रमांक जारी करेल.
पियूष गोयल यांनी नोएडा सेझमध्ये वाणिज्य सप्ताहाच्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी घोषणा केली की, वाणिज्य सप्ताह ७४९ जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आम्ही या अभियानाची सुरुवात करीत आहोत ही खूप अभिमानाची बाब आहे. उत्तर प्रदेश विमानतळ, रेल्वे, मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हबसारख्या बाबींमध्ये महत्त्वाचे काम करीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०१८-१९ मध्ये व्यापार करण्यात सुटसुटीतपणामुळे १२ व्या क्रमांकावर आले आहे. वाणिज्य सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही निर्यातदार आणि व्यापारी वर्गाचा विश्वास मिळवत आहोत.
कंटेनरच्या कमतरतेबाबतच्या प्रश्नाबाबत मंत्री म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांपासून त्यांच्या उत्पादनांच्या निर्यातीपर्यंत सर्व स्तरावर वितरणासाठी मदत करीत आहोत. कंटेनरबाबत रेल्वे आणि जहाज मंत्रालयातील कॅबिनेट सचिवांशी चर्चा सुरू आहे. याप्रश्नी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link