लाहौर :सरकारचा इरादा आहे की, प्रति एकर तयार उत्पादनाच्या अनुपातानुसार, तिसर्या पक्षाद्वारा साखरेची किेंमत निश्चित केली जाईल. ही बाब पंजाबचे खाद्य मंत्री समीउल्लाह चौधरी यांनी सांगितले. शेतकरी बोर्ड पाकिस्तानचे उपाध्यक्ष मियां फारुक अहमद आणि केंद्रीय महासचिव शौकत अली चाधर यांच्या नेतृत्वाखाली एका प्रतिनिधीमंडळाने गुरुवारी मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मंत्री बोंलत होते.
बैठकीत खाद्य निदेशक वाजिद अली शाह यांची उपस्थिती होती. प्रतिनिधीमंडळाने उसाचे समर्थन मूल्य 250 रुपये प्रति करण्याची मागणी गेली होती, ज्यावर मंत्र्यांनी सांगितले की, खाद्य विभाग यावर विचार करेल. चौधऱी म्हणाले की, सरकारही शेतकर्यांच्या हितासंदर्भातच निर्णय घेणार आहे.
मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना भेटायला आलेल्या पीएसएमए (पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन) च्या प्रतिनिधींनाही असे सांगितले होते की, शेतकरी आणि कारखान्यां बरोबर चर्चा करुन तिसर्या पक्षाने उस आणि साखरेच्या किंमती निश्चित कराव्यात. शेतकर्यांच्या हितांची रक्षा आणि त्यांच्या पीकांची पूर्ण किमत दिली जाण्याचा दावा करताना मंत्र्यांनी सांगितले की, सरकार शेतकर्यांना दलालांच्या शोषणापासून वाचवण्यासाठी त्यांना शेतकरी कार्ड देखील देत आहे.