फगवाडा : फगवाडीतील गोल्डन संधर साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याबद्दल कपूरथला जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकजवळील फगवाडा बस स्टँडची इमारत, जीम व तेथील सर्व साहित्य आणि इतर वस्तू जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अटॅच्ड (नोंदणी बोजा) करण्यात आल्या आहेत. यात जीमची जमीन वगळण्यात आली आहे. त्याची मालकी महाराज जगतजीत, कपूरथला म्हणजेच सध्या पंजाब सरकारकडे आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार डिफॉल्टर कारखान्याकडून ऊस थकबाकी वसूल करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून जीमच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश आहेत.
पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, फर्मची बँक खाती सील करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले. फगवाडाच्या तहसीलदारांनी सांगितले की, गोल्डन संधार साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ५० कोटी ३३ लाख रुपये थकीत आहेत. कारखान्याचे मालक हे ऊस बिले देण्याबाबात प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांची जमीन व इतर मालमत्ता पंजाब सरकारच्या माध्यमातून कपूरथला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अटॅच्ड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची लवकरात लवकर वसुली केली जाईल.