मोठा दिलासा : देशात कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने घट

नवी दिल्ली : भारतात कोविड १९च्या रुग्णसंख्येत घसरण होत आहे. गेल्या २४ तासात २५०३ जण संक्रमित झाले आहेत. मे २०२० नंतर ही सर्वात कमी संख्या आहे. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३६१६८ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीनुसार कोविड १९ ची एकूण रुग्णसंख्या ४२९९३४९४ झाली आहे. तर २७ जणांच्या मृत्यूनंतर एकूण कोविड बळींची संख्या ५१५८७७ झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.०८ टक्के इतकी आहे. तर कोविडमधून बरे होण्याचे प्रमाण ९८.७२ टक्के आहे.

गेल्या २४ तासात कोविडमधून बरी झालेल्यांची संख्या १९०१ नोंदविण्यात आली आहे. तीन मे २०२० नंतर ही सर्वात कमी संख्या आहे. उपचारातून बरे झालेल्या संख्या ४२४४१४४९ झाली आहे. तर मृत्यूदर १.२० टक्क्यावर आला आहे. आतापर्यंत कोविड विरोधी लसीकरणात १८०.१९ कोटी लसी देण्यात आल्या आहेत. दैनिक संक्रमण दर ०.४७ टक्के इतका आहे. तर साप्ताहिक संक्रमण दर ०.४७ टक्के आहे. आतापर्यंत ७७.९० कोटी नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात ५३२२३२ जणांचे नुमने घेण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here