नवी दिल्ली : चीनीमंडी
आगामी साखर हंगामात (२०१९-२०) जागतिक बाजारात साखरेचा तुटवडा जाणवणार असल्याचा अंदाज विश्लेषक ग्रीन पूल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी १६ लाख २० हजार टन तुटीचा अंदाज होता तर, तो आता नव्याने ३६ लाख ७० हजार टन तुटवडा असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील ग्रीन पूल यांनी सांगितले की, दक्षिण मध्य ब्राझील आणि भारतातील पीक पद्धतीत बदल झाल्यामुळे हा तुटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जगातील साखरेचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतात २६८ लाख टनावरून साखर उत्पादन २५८ लाख टनापर्यंत खाली येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, भारतात दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस लागवड कमी झाली आहे. थायलंडमध्येही तिच परिस्थिती आहे. तसेच युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमध्येही फारशी समाधानकारक परिस्थिती नाही, त्यामुळेच हा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचं ग्रीन पूल यांनी सांगितलं.
सलग दोन वर्षे विक्रमी साखर उत्पादन केलेल्या भारतात २०१९-२० च्या हंगामात २९५ लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो आता २८३ लाख टनापर्यंत खाली आला आहे. जगातील सर्वाधिक शिल्लक साठा असलेली भारतीय बाजारपेठही मंदीत आहे. जागतिक बाजारात २०१७-१८ मध्ये १८८ लाख टन अतिरिक्त साखर होती. ती २०१८-१९ मध्ये ३७ लाख टन अतिरिक्त साखरेपर्यंत खाली आली.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.