लोकनेते राजारामबापू पाटील यांना अभिवादन

सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या १०४ व्या जयंतीनिमित अभिवादन करण्यात आले. राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रतीक पाटील म्हणाले कि, लोकनेते राजारामबापू पाटील यांची विचारधारा जपत सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन.

यावेळी माजी मंत्री, आ. जयंत पाटील, आ. मानसिंग नाईक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दिलीपतात्या पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील आदींनी स्वर्गीय बापूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here