लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना येथे १४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्मृतीस्थळी कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी अभिवादन केले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले कि, राज्याच्या विकासात विलासराव देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले आहे. राज्यात सहकाराच्या भरभराटीत आणि साखर उद्योगामध्ये त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
यावेळी माजी आमदार अँड. त्रिंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, जागृती शुगर इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्यामभाऊ भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील. माजी अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेना साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, विकास कारखान्याचे उपाध्यक्ष रवी काळे इंदिरा सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम संभाजी सुळ सचिन दाताळ यांच्यासह मांजरा कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी उपस्थित होते.