मुंबई : महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून गाळप हंगामाला जोर आला आहे. या हंगामात कारखाने जादा साखर उत्पादन करीत आहेत. राज्यात सोलापूर विभागात सर्वाधिक साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे.
साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर विभागात सर्वात जास्त ४० साखर कारखाने सुरू आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर विभागामध्ये ३७ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. सोलापूर विभागात उसाची रिकव्हरी ९ टक्क्यांपर्यंत आहे. उपलब्ध माहितीनुसार २३ जानेवारी २०२१ पर्यंत राज्यात एकूण १८२ साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात ६३२.७६ लाख टन उसाचे गाळप झाले असून ५७२.३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादनही झाले आहे.
महाराष्ट्रात सध्याच्या गळीत हंगामात जादा उसाची उपलब्धता असून गळीत हंगाम वेळेआधीच सुरू झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे.