जून 2023 या महिन्यात जीएसटी संकलन 1,61,497 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी म्हणजे केंद्राचा कर 31,013 कोटी रुपये तर, एसजीएसटी म्हणजे राज्यांचा कर 38,292 कोटी रुपये आणि आयजीएसटी 80,292 कोटी रुपये इतका आहे. (यात मालाच्या आयातीवरील शुल्कातून संकलित झालेले 39,035 कोटी रुपये समाविष्ट) आणि उपकर 11,900 कोटी रुपये इतका (यातही मालाच्या आयातीवरील शुल्कातून संकलित झालेले 1,028 कोटी रुपये समाविष्ट) निधी आहे.
सरकारने आयजीएसटी मधून, 36,224 कोटी रुपये सीजीएसटी मध्ये, तर 30269 कोटी रुपये एसजीएसटी मध्ये दिले आहेत. नियमित देय रक्कम वजा केल्यानंतर जून महिन्यात, केंद्रांचा एकूण महसूल म्हणजेच सीजीएसटी 67,237 कोटी रुपये तर राज्यांचा एसजीएसटी 68,561 कोटी रुपये इतका आहे. महाराष्ट्रात या महिन्यात 26,098.78 कोटी रुपये जीएसटी संकलित झाला, जो गेल्या वर्षीच्या जून महिन्यातील 22,341.40 कोटी रुपयांच्या तुलनेत 17 टक्के अधिक आहे.
जून 2023 या महिन्यासाठीचा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. या महिन्यात, देशांतर्गत व्यवहारातून मिळालेला महसूल ( यात सेवा आयातीवरील शुल्क समाविष्ट) गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील इतर स्रोतांकडून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे.
जीएसटी महसूल संकलनाने चौथ्यांदा 1.6 लाख कोटी रुपयांच्या वरची आकडेवारी गाठली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सरासरी मासिक जीएसटी संकलन 1.10 लाख कोटी रुपये, 2022-23 मध्ये 1.51 लाख कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 1.69 लाख कोटी रुपये इतके होते.
(Source: PIB)