जीएसटी संकलनाने तोडले सर्व विक्रम, पहिल्यांदाच १.८७ लाख कोटींवर कर जमा

नवी दिल्ली : आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाने आधीचे सर्व विक्रम मोडले आहेत. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन १.८७ लाख कोटी रुपये झाले आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक मासिक कर संकलन आहे. यामध्ये सीजीएसटी ३८,४४० कोटी रुपये, एसजीएसटी ४७,४१२ कोटी रुपये आणि आयजीएसटी ८९,१५८ कोटी रुपये यांचा समावेश आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या सलग १३ महिन्यांमध्ये मासिक जीएसटी संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जीएसटी लागू झाल्यापासून तिसऱ्यांदा हे संकलन १.६० लाख कोटी रुपयांपलिकडे गेले आहे. तर वार्षिक आधारावर १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च २०२३ मध्ये संकलन १,६०,१२२ कोटी रुपये झाले होते. गेल्या आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये एकूण जीएसटी संकलन १८.१० लाख कोटी रुपये झाले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ग्रॉस जीएसटी कलेक्शन २२ टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम तिमाहीत सरासरी मासिक कलेक्शन १.५५ लाख कोटी रुपये आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या तसेच तिसऱ्या तिमाहीतील सरासरी कलेक्शन १.५१ लाख कोटी रुपये, १.४६ लाख कोटी रुपये आणि १.४९ लाख कोटी रुपये झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here