जुलैमध्ये जमा झाला 1.02 लाख कोटी रुपयांचा जीएसटी

जुलै मध्ये जीएसटीचे एकूण संकलन 1.02 लाख कोटी रुपये झाले. 1 ऑगस्टच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्यावर्षी जुलै महिन्यात जमा झालेल्या 96.483 कोटी रुपयांपेक्षा जुलै 2019 मध्ये जीएसटी संकलनात 5.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील महसूल वसुली चालू आर्थिक वर्षात पहिल्यांदा जूनमध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या खाली गेली असून ती 99,939 कोटी रुपयांवर आहे.

यावर्षी जुलैमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 17,912 कोटी रुपये, राज्य जीएसटी 25,008 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी 50,612 कोटी रुपये (यामध्ये आयातीवर संकलित 24,246 कोटींचाही समावेश आहे), असे एका निवेदनात म्हटले आहे. तसेच सेसपोटी 8,551 कोटी रुपये संकलन होते (यामध्ये आयात कर 797 कोटीचा समावेश आहे), असेही यात म्हटले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here