नवी दिल्ली: अर्थ मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन 1.76 लाख कोटी रुपये झाले, जे गेल्या वर्षीच्या डिसेंबर 2023 मधील 1.64 लाख कोटी रुपयांपेक्षा 7.1 टक्के अधिक आहे.2024-25 मध्ये एकूण GST संकलन 9.1 टक्क्यांनी वाढून 16.33 लाख कोटी रुपये झाले आहे, तर 2023 च्या याच कालावधीत एकूण GST संकलन 14.97 लाख कोटी रुपये इतके होते.
1 जुलै 2017 पासून देशात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला आणि राज्यांना जीएसटी अधिनियम, 2017 च्या (राज्यांना भरपाई) तरतुदींनुसार परतफेड केली गेली. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे झालेल्या कोणत्याही महसुलाच्या नुकसानासाठी पाच वर्षांसाठी भरपाईची हमी देण्यात आली होती.
केसांचे तेल, टूथपेस्ट, साबण; डिटर्जंट आणि वॉशिंग पावडर, गहू,तांदूळ,दही, लस्सी, ताक, मनगटाचे घड्याळ; वॉशिंग मशिन, मोबाईल फोन या प्रमुख वस्तूंपैकी जीएसटी दर लक्षणीयरीत्या कमी करण्यात आले आहेत किंवा काहींसाठी शून्य ठेवण्यात आले आहेत. ज्याचा या देशातील लोकांना फायदा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री जीएसटी परिषदेच्या अध्यक्ष आणि सर्व राज्यांचे अर्थमंत्री सदस्य आहेत. जीएसटी परिषदेची ताजी बैठक 21 डिसेंबर रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे झाली.