डिसेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन १.२९ लाख कोटींवर, १३ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : डिसेंबर २०२१ मध्ये गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत वस्तू तथा सेवा कर (जीएसटी) वसुली १३ टक्क्यांनी वाढली आहे. एकूण १.२९ लाख कोटी रुपयांहून अधिक कर वसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रीलयाने दिली आहे. डिसेंबर महिन्यात जीएसटी वसुली नोव्हेंबरच्या १.३१ लाख कोटींपेक्षा थोडी कमी झाली आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत गेल्या सलग आठ महिन्यांमध्ये केंद्र सरकारने एक लाख कोटींवर महसूल मिळवला आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, डिसेंबर २०२१ मध्ये एकूण जीएसटी कर वसुली १,२९,७८० कोटी रुपये झाली. यामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) २२,५७८ कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) २८,६५८ कोटी रुपये आणि एकीकृत जीएसटी (आयजीएसटी) २२,५७८ कोटी रुपये आहे. आयजीएसटीमध्ये वस्तूंच्या आयातीवरील ३७,५२७ कोटी रुपयांचाही समावेश आहे. याशिवाय ९,३८९ कोटी रुपये उपकरही यामध्ये समाविष्ट आहेत.

डिसेंबर महिन्यात गेल्यावर्षीच्या या महिन्याच्या १.१५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १३ टक्के अधिक करवसुली झाली आहे. डिसेंबर २०१९ पेक्षा हा कर २६ टक्क्यांनी वाढला आहे. अर्थव्यवस्था रुळावर येण्यासह कर चोरी रोखण्याचे उपाय यासाठी उपयुक्त ठरले आहेत, असे मंत्रालयाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here