नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर परिषदेच (जीएसटी कौन्सिल) ३७वी बैठक येत्या २० सप्टेंबरला होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक गोव्यात होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. बैठकीत हेल्थकेअर सेक्टरला टॅक्स सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान अर्थमंत्री आणि कौन्सिलच्या अध्यक्ष निर्मला सीतारमण यांची ही पहिली आऊटस्टेशन मिटिंग असणार आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव गौव्यातील बैठक गेल्या वर्षी प्रलंबित राहिली होती.
जीएसटी परिषदेने यावेळी दिल्लीच्या बाहेर बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत प्रायव्हेट हेल्थकेअर सेक्टरला आयटीसीचा फायदा देण्याविषयी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यात भारतातील ऑटोमोबाइल सेक्टरला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दोन लाख तरुणांच्या नोकरीवर कुऱ्हाड ओढवली आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तातडीने त्या हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे गोव्यातील परिषदेकडे आता ऑटोमोबाइल क्षेत्राचेही लक्ष लागले आहे. परिषदेची यापूर्वीच बैठक २७ जुलैला दिल्लीत झाली होती. त्याबैठकीत इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय झाला होता. १२ टक्के टॅक्स पाच टक्क्यांवर आणण्यात आला. वाहनांसाठी चार्जर्स आणि चार्जिंग स्टेशनवरील १८ टक्के जीएसटी ५ टक्के करण्यात आला होता.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.