जॉर्जटाउन : गयाना सरकार देशातील साखर उद्योगाला पुनरुज्जीवन देण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. राष्ट्रपती डॉ. मोहम्मद इरफान अली यांनी देशाने ग्वालेमालासोबत या साठी काम करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. डॉ. अली म्हणाले, की ग्वाटेमाला जगातील चौथा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश आहे. लॅटीन तसेच मध्य अमेरिकेतील द्वितीय क्रमांकाचा मोठा निर्यातदार आहे. राष्ट्रपती अली म्हमाले की देशातील साखर उद्योगात ८०,००० प्रत्यक्ष रोजगार आणि ४ लाख १० हजार अप्रत्यक्ष रोजगार मिळतात. ग्वाटेलमालामध्ये २५१००० हेक्टर शेती क्षेत्रात ११ साखर कारखाने आहेत. तेथे प्रती हेक्टर १०.७ मेट्रिक टन उत्पन्न मिळते. त्यापैकी १ बिलियन अमेरिकन डॉलरची निर्यात होते. ग्वालेमाला आणि गुयाना यांची भागिदारी या व्यवसायाला स्थिरता, रोजगार संधी, आर्थिक विस्तार आणि व्यवहार्यता देतील.
सरकारने साखर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी गुयाना शुगर कॉर्पोरेशनला २०२२च्या बजेटमध्ये ६ बिलियन मंजूर केले आहेत. हा निधी एल्बियन, ब्लेयरमोंट आणि युटवलुगट कारखान्यांत खर्च होईल. गुयाना आणि ग्वाटेलाला यांनी बेलिज येथे चौथ्या कॅरिक़ॉम-एसआयसीए परिषदेत चर्चा केली होती. दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी सुरक्षा, हवामान बदल, कृषी, अन्न सुरक्षा आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याची घोषणा केली आहे.